श्रम संस्कार शिबिरातुन विद्यार्थी घडतात - श्रीराज भरणे.
श्रम संस्कार शिबिरातुन विद्यार्थी घडतात - श्रीराज भरणे.
------------------------------------
इंदापूर प्रतिनिधी
गणेश धनवडे
-------------------------------------
कुरवली ता. इंदापूर येथे इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन उपक्रमांतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले.शिबीर समारोप प्रसंगी युवा नेते श्रीराज भरणे यांनी श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थी घडत असल्याचे सांगितले.यावेळी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग,छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक पृथ्वीराज घोलप, जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य सचिन सपकळ,महाविद्यालय प्राचार्य डॉ.अशोक काळंगे,सरपंच राहुल चव्हाण,उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग,मुख्याध्यापिका लक्ष्मी गायकवाड ,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे,प्रा.सुवर्णा बनसोडे,प्रा.अमर वाघमोडे,प्रा रवी गायकवाड,प्रा.महादेव माळवे,प्रा.नितीन रुपनवर,प्रा.सोमनाथ चव्हाण,प्रा.आकांक्षा मेटकरी,ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार पांढरे,सदस्य शिवाजी चव्हाण,सोसायटी सदस्य महेश पांढरे,अंगणवाडी सेविका कीर्ती कदमइत्यादी मान्यवर उपस्थित होते.सात दिवशीय शिबिरामध्ये स्वच्छता अभियान,महिला सबलीकरण व सक्षमीकरण,मतदार साक्षरता अभियान,समर्थ भारत सक्षम युवा अभियान, माझा गाव डिजिटल लिटरसी सर्वेक्षण, वृक्षारोपण,महात्मा गांधी विचार शाश्वत व सर्वांगीण ग्रामीण विकास,रस्ते सुरक्षा जनजागृती,आरोग्य विषयक जनजागृती, गावातील मंदिरे संवर्धन व स्वच्छता अभियान इत्यादी उपक्रम घेण्यात आले शिबिर समारोप प्रसंगी युवा नेते श्रीराज भरणे यांनी विद्यार्थी संस्कारक्षम घडवण्याचं काम श्रमसंस्कार शिबिरात होत असल्याचे सांगितले.सामाजिक जाणीव तसेच वैचारिक प्रबोधन इत्यादीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या शिबिरात प्रबोधन होत असल्याने जीवनात श्रम संस्कार शिकवण्याचे काम शिबिराच्या माध्यामातून होत असल्याचे भरणे यांनी सांगितले.संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी मागील तीन वर्षापासून कुरवली गावात विशेष श्रमसंस्कार शिबिर यशस्वीरित्या घेण्यात आल्याने गावात सार्वजनिक स्वच्छता,आरोग्य विषयक जनजागृती व सामाजिक कार्य विद्यार्थ्यांच्या हातून घडल्याचे सांगितले.संचालक पृथ्वीराज घोलप,सचिन सपकळ ,माजी विद्यार्थी दिलीप पांढरे ,भीमराव दणाणे यांनी शिबिरातील उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते दिलीप पांढरे,बापूराव चव्हाण,भीमराव दणाणे, संदीप चव्हाण,तात्या निंबाळकर,भालचंद्र चव्हाण, शिबिरार्थी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments: