विद्यामंदिर शाहूनगर शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'पॉट पेंटिंग' आणि 'फेस पेंटिंग' या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन
विद्यामंदिर शाहूनगर शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'पॉट पेंटिंग' आणि 'फेस पेंटिंग' या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन.
---------------------------------गांधीनगर प्रतिनिधी.
उदय साळुंखे .
----------------------------
तालुका करवीर येथील गडमुडशिंगी विद्यामंदिर शाहूनगर
शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'पॉट पेंटिंग' आणि 'फेस पेंटिंग' या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला.
पॉट पेंटिंगमध्ये विद्यार्थ्यांनी साध्या मातीच्या कुंड्यांवर विविध रंग, वारली आर्ट आणि नक्षीकाम करून त्या आकर्षक बनवल्या. तर फेस पेंटिंगमध्ये विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या चेहऱ्यावर निसर्गचित्र, प्राणी आणि विविध संदेश देणारी चित्रे रेखाटून आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवले.
मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या या कौशल्याचे कौतुक केले आणि अशा उपक्रमांमुळे मुलांची एकाग्रता व सर्जनशीलता वाढते, असे मत व्यक्त केले.या उपक्रमामध्ये
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मैत्राली किरण खटावकर- .व अध्यापिका दैवशाला भारत मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments: