Header Ads

जयसिंगपूर अवैध धंद्यां लपवून आईचा खेळ महिलांच्या सुरक्षेबाबत नागरिकांचा सवाल.

 जयसिंगपूर अवैध धंद्यां लपवून आईचा खेळ महिलांच्या सुरक्षेबाबत नागरिकांचा सवाल.

-----------------------------------

जयसिंगपूर प्रतिनिधी

-----------------------------------

जयसिंगपूर शहरात अवैध धंद्यांबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू असून, यामुळे नगरपरिषदेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अवैध व्यावसायिक म्हणून ओळख असलेला एक व्यक्ती नगरसेवक झाल्याची चर्चा नागरिकांत असून, त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचेही बोलले जात आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा पार्श्वभूमीची चर्चा असतानाही संबंधित व्यक्तीचे कथित अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. या बाबतीत जयसिंगपूरचे नगराध्यक्ष व काही नगरसेवक स्पष्ट भूमिका घेत नसल्याने ते संबंधित व्यक्तीला पाठीशी घालत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरात अवैध धंद्यांसाठी फुकट सोयी-सुविधा दिल्या जात असल्याची चर्चा असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर १० नंबर शाळा मागणी सोसायटीने थेट सवाल उपस्थित केला आहे,

“जयसिंगपूर नगरपरिषद हद्दीत आमच्या बहीणी आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का?”

सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जर अवैध धंद्यांबाबतच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असेल तर त्याचा परिणाम थेट समाजाच्या सुरक्षिततेवर होऊ शकतो.

दरम्यान, शहरात आणखी चर्चा अशी आहे की संबंधित प्रकरणात एका नगरसेविकेचा मुलगा कथित अवैध व्यवहारांशी जोडला जात असल्याचे आरोप होत आहेत. यामुळे “सत्तेचा व नातेसंबंधांचा गैरवापर तर होत नाही ना?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.

१० नंबर शाळा मागणी सोसायटीसह नागरिकांनी मागणी केली आहे की, या सर्व चर्चांबाबत व आरोपांबाबत निष्पक्ष, कायदेशीर चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी. अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

जयसिंगपूर शहरात विकासासोबत कायदा-सुव्यवस्था आणि महिलांची सुरक्षितता अबाधित राहावी, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.

No comments:

Powered by Blogger.