Header Ads

मातीसाठी पोखरला जातोय 'पंचगंगा' 'कृष्णाकाठ'प्रशासनाचे दुर्लक्ष लाखोंचा महसूल खड्ड्यात परवान्यापेक्षा जादा उत्खनन वीटभट्टी मालकांची चांदी.

 मातीसाठी पोखरला जातोय 'पंचगंगा' 'कृष्णाकाठ'प्रशासनाचे दुर्लक्ष लाखोंचा महसूल खड्ड्यात परवान्यापेक्षा जादा उत्खनन वीटभट्टी मालकांची चांदी.

-------------------------------------

जयसिंगपूर प्रतिनिधी 

नामदेव भोसले

-------------------------------------

संथ वाहणान्या कृष्णा नदीला प्रदूषणाचे ग्रहन लागले आहे.. याशिवाय कृष्णा काठावर बीट भट्ट्यांचे पेव फुटले आहे. बीटेसाठी लागणार्या मातीसाठी कृष्णा काठ अक्षरश: पोखरला जात आहे. त्यामुळे नदी काठची शेती अन् गावे धोक्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाचे मात्र याकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष आहे. परवान्यापेक्षा जादा माती उपसा होत असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे तर बीटभट्टी चालक अन्

माती तस्करांनी मात्र चांदी सुरु आहे कृष्णेतून बाळू उपसा करण्यास बंदी आहे. मात्र रात्रीच्या वेळी बाळू उपशाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याशिवाय बाळू बरोबर माती उत्खननाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. कृष्णा नदीकाठी कोथळी,उदगांव, अर्जुनवाड राजापूर, खिद्रापूर ,नरसोबावाडी पासून अगदी राजापूर खिद्रापूर पर्यंत वीट भट्ट्याची संख्या वाढली आहे. नदीकाठावरच वीट भट्टी मालकांनी बस्तान बसवले आहे. यापैकी बहुतांशी वीटभट्टया विनापरवाना सुरु आहेत त्यापैकी काहींना परवाना आहे मात्र प्रशासनाच्या डोक्यात धूळ फेकून त्यांचा गोरखधंदा मात्र सुरु आहे.

 


चौकट..

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज

मोठ्या प्रमाणात माती उपसा होत असल्याने कृष्णा काठ खचला आहे. अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसतो आहे. तक्रार करूनही अधिकारी कारवाई करत नसल्याने शेतकरी त्रासून गेले आहेत. काही सामाजिक कार्यकत्यांनी या विरोधात आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच आता यामध्ये लक्ष घालून माती तस्करांना चाप लावावा अशी मागणी नदी काठच्या शेतकऱ्यांच्यामधून होत आहे.


चौकट..


महसूलचा आशिर्वाद; तस्करांची चांदी

वास्तविक माती उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी महसूलच्या अधिकार्यांच्याकडे केल्या आहेत. मात्र कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे माती तस्करांचे चांगलेच फावले आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार माहित असूनही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बेकायदेशीपणे माती उपसा करण्यास महसूलचाच आशिर्वाद आहे काय असा प्रश्न नागरिकांच्यामधून उपस्थित केला जाऊ लागला आहे. तहसिलदारही याकडे गांभियाने पाहण्यास तयार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यामागचे गौडबंगाल काय असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागला आहे

चौकट..

धडक कारवाईची गरज कृष्णा काठावर वाळू तस्करांबरोबर माती तस्करांचीही अरेरावी वाढली आहे. तक्रारी करणार्या शेतकऱ्यांना धमकाविण्याचे प्रकार त्यांच्याकडून सुरु आहेत. त्यामुळे शेतकरीही दबावाखाली आहेत. तस्करांच्या भयामुळे तक्रारी करण्यास ते फारसे धजावत नाहीत. त्यामुळे तस्करांचे फावले आहे तरकरांचे कंबरडे मोडण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या धडक कारवाईची आवश्यकता आहे.

चौकट.

बेकायदेशीर उपसा, बेकायदेशीर वाहतूक वीटसाठी लागणारी माती कृष्णा नदीकाठावर मुबलक प्रमाणात आहे. याचा फायदा बीटभट्टी चालक अन् माती तस्करांनी उठवला आहे. चेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात माती उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णाकाठ ढासळू लागला आहे. वीटभट्ट्या असलेल्या गावांच्या ठिकाणी परवान्यापेक्षा अनेक पटीने बिनाबोभाटपणे माती उपसा करण्यात येते. अगदी जेसीबी लावून माती काढली जात आहे. त्यामुळे अवघा नदीकाठ धोक्यात आला आहे. नदीकाठी शेती अन् गावांना धोका निर्माण झाला आहे. याशिवाय शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही या तस्करांच्याकडून बुडवला जात आहे. सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातही बेकायदेशीपणे माती उत्खनन करुन तीची वाहतूक केली जात आहे.


चौकट...

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज

मोठ्या प्रमाणात माती उपसा होत असल्याने कृष्णा काठ खचला आहे. अनेक शेतकन्यांना याचा फटका बसतो आहे. तक्रार करूनही अधिकारी कारवाई करत नसल्याने शेतकरी त्रासून गेले आहेत. काही सामाजिक कार्यकत्यांनी या विरोधात आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच आता यामध्ये लक्ष घालून माती तस्करांना चाप लावावा अशी मागणी नदी काठच्या शेतकऱ्यांच्यामधून होत आहे.

No comments:

Powered by Blogger.