प्रफुल्लित केंद्रा तर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा!
प्रफुल्लित केंद्रा तर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा!
-------------------------------
कोल्हापूर: प्रतिनिधी
-------------------------------
सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायामाचा राजा आहे, हा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्याप्रति जागरूक करण्यासाठी 'प्रफुल्लित केंद्र' कोल्हापूरच्या वतीने 'जागतिक सूर्यनमस्कार दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या 'फिट कोल्हापूर' या विशेष मोहिमेचा भाग म्हणून रंकाळा परिसरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. अल्फिया यांनी सूर्यनमस्कार हे सर्वांगीण व्यायामाचे सर्वोत्तम साधन असल्याचे सांगितले. केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक एकाग्रता वाढवण्यासाठी सूर्यनमस्कारांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.रेश्मा कातकर यांनी अत्यंत अचूक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार कसे घालावेत, याचे प्रात्यक्षिक करून घेतले.
"धावपळीच्या युगात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. सूर्यनमस्काराच्या माध्यमातून आपण संपूर्ण शरीराला ऊर्जा देऊ शकतो. कोल्हापूरला फिट आणि तणावमुक्त बनवण्यासाठी आमचा हा प्रयत्न निरंतर सुरू राहील," असे प्रतिपादन प्रफुल्ल पाटील यांनी यावेळी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रफुल्लित केंद्राच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये दिपाली पाटील, समीक्षा प्रभावळे, सुप्रिया गावडे,प्रिन्स पाटील आणि अर्पिता मोरे यांचा सक्रिय सहभाग होता.

No comments: