राधानगरीत निवडणूक आचारसंहितेची कडक अंमलबजावणी शिरगाव परिसरातील रस्त्यांवरील राजकीय झेंडे काढले*
राधानगरीत निवडणूक आचारसंहितेची कडक अंमलबजावणी
शिरगाव परिसरातील रस्त्यांवरील राजकीय झेंडे काढले.
---------------------------------राधानगरी | प्रतिनिधी विजय बकरे
------------------------------------
राधानगरी तालुक्यात येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असून, चारगाव परिसरातील महामार्ग व रस्त्यांच्या कडेला लावलेले विविध राजकीय पक्षांचे झेंडे शासकीय कर्मचाऱ्यांनी काढून टाकल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सौ. अनिता देशमुख यांनी दिली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय पक्षांकडून नियमबाह्य पद्धतीने रस्त्यांच्या कडेला झेंडे लावण्यात आले होते. या प्रकाराची दखल घेत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सौ. अनिता देशमुख यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बर्गेवाडी, शिरसे, शिरगाव, आमजाई व व्हरवडे या परिसरातील रस्त्यांच्या कडेला लावलेले झेंडे हटविण्याची कारवाई केली.
निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असून, नियमभंग करणाऱ्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सौ. अनिता देशमुख यांनी स्पष्ट केले.

No comments: