Header Ads

गडमुडशिंगी येथे चांदीची पावले व गाभाऱ्याची चौकट अर्पण श्री.धुळसिद्ध बिरदेव यात्रेला भक्तिभावात प्रारंभ

 गडमुडशिंगी येथे चांदीची पावले व गाभाऱ्याची चौकट अर्पण

श्री.धुळसिद्ध बिरदेव यात्रेला भक्तिभावात प्रारंभ.

-----------------------

गांधीनगर:प्रतिनिधी

उदय साळुंखे.

----------------------

गडमुडशिंगी, (ता. करवीर ) येथे  १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान श्री. धुळसिद्ध बिरदेव वार्षिक यात्रा  होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत श्री.धुळसिद्ध बिरदेव आहे.


 रविवारी करसिद्ध माळीतून देव वस्तीमध्ये येण्याने झाली.यात्रेनिमित्त सोमवारी गावचा देवाला गोडा नैवेद्य,  देवाचा सबिना व पालखी सोहळा, मंगळवारी गावाचा खारा नैवेद्य (गाव बोणी), देवाचा सबिना व पालखी सोहळा तर बुधवारी मानाच्या मानकऱ्यांच्या आंबिलीने यात्रेची सांगता व देव खाली जाण्याचा विधी पार पडणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी मगदूम कुटुंबियांच्या वतीने आंबील प्रसादाने यात्रेची विधिवत सुरुवात करण्यात आली.

 ग्रामदैवत श्री. धुळसिद्ध बिरदेव देवस्थानात भक्तिभावपूर्ण वातावरणात वार्षिक यात्रेला सुरुवात झाली. यात्रेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

 रविवारी  गवळी यांच्या निवासस्थानापासून ढोल-ताशे व कैताळाच्या गजरात चांदीच्या पावलांची मिरवणूक काढण्यात आली. श्री. धुळसिद्ध बिरदेव देवस्थान व गडमुडशिंगी ग्रामस्थांच्या वतीने संबंधित भक्ताचा सन्मान करण्यात आला.

याच दरम्यान समस्त मातंग समाज, गडमुडशिंगी यांच्या वतीने श्री. धुळसिद्ध बिरदेव मंदिराच्या गाभाऱ्यासाठी चौकट अर्पण करण्यात आली. 



दरम्यान धुळसिद्ध बिरदेवांच्या पदस्पर्शाने पुडीत झालेल्या गडमुडशिंगी गावाला संपूर्ण राज्यात व राज्याबाहेर 'देवाची मुडशिंगी' म्हणून संबोधण्यात येते. तसेच यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे फक्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मनोरंजनाच्या कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. 


चौकट 

सूर्यकांत किसन गवळी 

(रा. गडमुडशिंगी) या भाविकांनी श्री.. धुळसिद्ध बिरदेव देवांच्या पूजेसाठी चांदीची पावले देवाला अर्पण केली.


फोटो ओळ

 गडमुडशिंगी येथील श्री धुळसिद्ध बिरदेव


व दुसऱ्या छायाचित्रात गवळी कुटुंबियांकडून अर्पण करण्यात आलेली चांदीची पावले

No comments:

Powered by Blogger.