इचलकरंजीतील ‘क-1 शेरा’ हटवण्याचा मार्ग मोकळा; आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश.
इचलकरंजीतील ‘क-1 शेरा’ हटवण्याचा मार्ग मोकळा; आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश.
-------------------------मुंबई येथे इचलकरंजी शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या ‘क-1 शेरा’ हटवण्याच्या संदर्भात महसूल मंत्री **चंद्रशेखर बावनकुळे** यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार **डॉ. राहुल आवाडे साहेब** यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीत आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील हजारो मिळकतींवरील ‘क-1 शेरा’ हटविण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तातडीने कॅबिनेटसमोर सादर करण्याची मागणी केली. त्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देत, यास लवकरच मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही दिली.
सुमारे ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नामुळे शहरातील मिळकतधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ‘क-1 शेरा’मुळे बांधकाम परवाने, कर्ज तारण, नकाशा मंजुरी, मालकी हक्क स्पष्टता अशा अनेक बाबींमध्ये अडथळे निर्माण झाले होते, ज्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
यापूर्वी इचलकरंजी नगरपरिषदेमार्फत भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीस मान्यता देण्यात आली होती. मात्र मनुष्यबळाच्या अभावामुळे ती प्रक्रिया रखडली. त्यानंतर खाजगी एजन्सी **सारथी इंजिनियर्स, पुणे** यांच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ मोजणी करून अभिलेख तयार करून जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करण्यात आले. तरीही पुढील कार्यवाही न झाल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला होता.
अखेर आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रश्नाच्या समाधानाकडे निर्णायक पाऊल पडले असून, ‘क-1 शेरा’ हटवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या बैठकीस महापौर उदय धातुंडे, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील प्रशांत भोसले, प्रांताधिकारी दीपक शिंदे, अप्पर तहसीलदार महेश खिलारी, तसेच भूमी अभिलेख अधिकारी उपस्थित होते

No comments: