अवकाळी पावसाने वारणा पशुखाद्य कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान.
अवकाळी पावसाने वारणा पशुखाद्य कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान.
-------------------------पन्हाळा-माधुरी मस्कर
9623995566.
------------------------
अवकाळी अतिवृष्टीचा मोठा फटका वारणानगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पशुखाद्य कारखान्याला बसला आहे. कारखान्याच्या आवारात आणि गोदामात पावसाचे पाणी शिरल्याने कच्चा माल आणि तयार पशुखाद्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे परिसरात मोठे नुकसान झाले. पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाल्याने पावसाचे पाणी थेट पशुखाद्य कारखान्याच्या मुख्य गोदामात शिरले. गोदामात साठवून ठेवलेला मका, डीओआरबी,मीठ अशा विविध प्रकारचा कच्चा माल आणि तयार 'वारणा' पशुखाद्याची हजारो पोती पाण्यामुळे खराब झाली आहेत.
पशुखाद्य बनवण्यासाठी लागणारे धान्य पावसाच्या पाण्यात भिजल्याने ते आता प्रक्रियेसाठी वापरण्यायोग्य राहिलेले नाही.कारखान्यातील काही इलेक्ट्रॉनिक मोटारी आणि वजन काट्यांमध्ये पाणी गेल्याने उत्पादनाचे काम तात्पुरते ठप्प झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार,हे नुकसान लाखो रुपयांच्या घरात असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पारगावचे ग्राम महसूल अधिकारी,ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी यांनी कारखान्याची पाहणी केली.भिजलेला माल सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
यावेळी पशुखाद्य विभाग व्यवस्थापक जे.बी.कुलकर्णी, अक्कौट्स व्यवस्थापक प्रविण शेलार,प्रकाश पाटील,तुषार माने आदी कर्मचारी उपस्थित होते.
चौकट-
"अचानक झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे हे नुकसान झाले आहे.पशुखाद्य कारखान्याकडे पावसामुळे झालेल्या नुकसान दुरुस्तीचे काम चालू असून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे."
— सुधीर कामेरीकर,कार्यकारी संचालक,वारणा दूध संघ

No comments: