Header Ads

ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत अधिकाऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की; सरकारी कामात अडथळा, गुन्हा दाखल

 ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत अधिकाऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की; सरकारी कामात अडथळा, गुन्हा दाखल.


करवीर  तालुक्यातील गडमुडशिंगी ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना ग्रामपंचायत अधिकाऱ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल किरण खोत (वय ३२) हे गडमुडशिंगी ग्रामपंचायतीत शासकीय कामकाज करत असताना संजय राजाराम पाटील (रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) यांनी कार्यालयात येऊन जिल्हा परिषद उपाध्यक्ष व ग्रामपंचायत प्रशासक (सरपंच) यांच्यात वाद निर्माण करत असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर फिर्यादीस शिवीगाळ करत "तुम्हाला पायताणाने मारीन" अशी धमकी देऊन अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याची तक्रार करण्यात आली.

या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, ११५(२) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सांवत करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.