Header Ads

ओतूर पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचाऱ्याचा कर्तव्यदक्षपणा : ड्युटीवर असतानाच केली वटपौर्णिमेची पूजा.

 ओतूर पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचाऱ्याचा कर्तव्यदक्षपणा : ड्युटीवर असतानाच केली वटपौर्णिमेची पूजा.

ओतूर (प्रतिनिधी ): कर्तव्य आणि संस्कृती यांचा सुरेख संगम साधत ओतूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी सुषमा मारुती मुदगुन यांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी ओतूर पोलीस स्टेशनमध्ये आपले कर्तव्य बजावत होत्या. अलीकडेच ओतूर हद्दीत अपघातांची मालिका सुरू असल्यामुळे पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण होता. अशा परिस्थितीतही सुषमा मुदगुन यांनी आपल्या धार्मिक भावना जपत ड्युटी सांभाळून पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना खुबी गावच्या परिसरातील वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली.

"पोलिसांची ड्युटी २४ तासांची असते. सण-वार बघून सुट्टी मिळत नाही. पण याचा अर्थ आपली संस्कृती विसरायची असा नाही," असे मत ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी व्यक्त करताना  सांगितले. महिला पोलीस कर्मचारी सुषमा मूदगुन यांनी कर्तव्याला प्राधान्य देत, वेळात वेळ काढून वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

ओतूर पोलीस स्टेशन सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. अलीकडेच ३ लाख ८७ हजारांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादीला परत करण्याची कामगिरी असो, किंवा अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला काही तासांत अटक करण्याची कारवाई असो, या सर्व घटनांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही मोलाचा वाटा आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही महिला सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. अशा पार्श्वभूमीवर सुषमा मूगदुम यांनी दाखवलेला कर्तव्य आणि संस्कृतीचा समन्वय इतर महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

No comments:

Powered by Blogger.