Header Ads

राधानगरीत रानगव्याचा हल्ला; वृद्धाचा मृत्यू छातीत शिंगे खुपसल्याने गंभीर जखमी; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली.

 राधानगरीत रानगव्याचा हल्ला; वृद्धाचा मृत्यू

छातीत शिंगे खुपसल्याने गंभीर जखमी; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली.

------------------

राधानगरी प्रतिनिधी :

विजय बकरे.

------------------

राधानगरी तालुक्यातील पालखुर्द येथे शनिवारी (दि. ११) दुपारी सुमारे दोनच्या सुमारास रानगव्याच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शामराव कोडिंबा कोराणे (वय ८०, रा. पालखुर्द, ता. राधानगरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते घराच्या पाठीमागील झाडाखाली बसले होते. त्याच वेळी जंगलातून खाली आलेल्या रानगव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात रानगव्याने त्यांच्या छातीत शिंगे खुपसल्याने ते गंभीर जखमी झाले.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खाजगी वाहनातून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

दरम्यान, राधानगरी परिसरात वारंवार वन्यप्राण्यांचे हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

मृत शामराव कोराणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.

No comments:

Powered by Blogger.