Header Ads

कागलमध्ये शाहु हायस्कूल परिसरातील दुकानदाराची एम-८० लंपास, चोरटा सीसीटीव्हीत कैद

 कागलमध्ये  शाहु हायस्कूल परिसरातील दुकानदाराची एम-८० लंपास, चोरटा सीसीटीव्हीत कैद.

----------------------

प्रतिनिधी एस एन शेख .

-------------------------

कागल शहरातील भरवस्तीत असलेल्या छत्रपती शाहु हायस्कूलच्या मागील परिसरातून एका दुकानदाराची एम-८० गाडी चोरट्यांनी पळवल्याची घटना समोर आली आहे. चोरीचा हा सर्व प्रकार  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संबंधित दुकानदाराने आपली एम-८० गाडी नेहमीप्रमाणे घरासमोर पार्क केली होती. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या परिसराची रेकी करून अत्यंत सराईतपणे ही गाडी लंपास केली. सकाळी गाडी जागेवर नसल्याचे निदर्शनास येताच परिसरात शोध घेण्यात आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे गाडी घेऊन जात असताना  दिसून आले.

आतापर्यंत महागड्या दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांनी आता आपला मोर्चा जुन्या गाड्यांकडेही वळवला आहे. कागल शहरात एम-८० सारख्या जुन्या गाड्या चोरीला गेल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कष्टाच्या पैशातून घेतलेली वाहनं अशाप्रकारे चोरीला जात असल्याने "सामान्य माणसाने जगायचं कसं?" असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध होणार का?.  अशी चर्चा नागरिकांतून यावेळी होत होती.

No comments:

Powered by Blogger.