सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या रोजगार मेळाव्यात 74 विद्यार्थ्यांची टाटा ऑटो कंपनी पुणे येथे निवड
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या रोजगार मेळाव्यात 74 विद्यार्थ्यांची टाटा ऑटो कंपनी पुणे येथे निवड
-------------------------
मुरगूड/ जोतीराम कुंभार .
-------------------------
येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूडच्या रोजगार मेळाव्यात 74 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यू द्वारे टाटा ऑटो कंपनी पुणे येथे निवड करण्यात आली या मेळाव्यामध्ये टाटा ऑटो कंपनी पुणे द्वारे कॅम्पस इंटरव्यू च्या माध्यमातून पात्र उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखती द्वारे करून त्यांना लगेच नोकरीची ऑर्डर ही देण्यात आली. रोजगार मेळाव्याचे उद्घाटन टाटा कंपनी पुण्याचे प्रोडक्शन मॅनेजर श्री दादासाहेब पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे कार्यवाह अण्णासाहेब थोरवत हमीदवाडा आय टी आय चे प्राचार्य अमोल वास्कर टाटा कंपनीचे मेकॅनिकल इंजिनियर श्री शिवराज पाटील या मान्यवरांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले .
रोजगार मेळाव्यासाठी जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी मा. खासदार प्रा. संजय दादा मंडलिक संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड वीरेंद्र मंडलिक संस्थेचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .
या रोजगार मेळाव्याच़्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे होते. या रोजगार मेळाव्यात प्राचार्य अमोल वास्कर टाटाअॅटो कंपनी पुण्याचे प्रोडक्शन मॅनेजर दादासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले .
रोजगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.होडगे म्हणाले या भागातील गोरगरीब होतकरू तरुणांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून टाटा ऑटो कंपनी पुणे येथे संधी मिळावी यासाठी मा. खासदार प्रा. संजय दादा मंडलिक साहेबांचा व जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड वीरेंद्र मंडलिक यांचा विशेष प्रयत्न आहे. या भागातील विद्यार्थी स्वावलंबी करण्यासाठी त्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी आमचे हे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. टाटा ऑटो कंपनी पुणे यांनी दिलेला प्रतिसाद खूपच महत्त्वाचा आहे. यावेळी स्वागत प्रा.सुशांत पाटील यांनी केले तर आभार प्रा. दिगंबर गोरे यांनी मांडले रोजगार मेळाव्यासाठी 100 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 74 विद्यार्थ्यांची टाटा ऑटो कंपनी पुणे येथे निवड झाली.

No comments: