Header Ads

प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.

 प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी  स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.


मलकापूर प्रतिनिधी 

रोहित पास्ते 


     प्रा.डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालय मलकापूर - पेरीड येथे माजी विद्यार्थी कल्याणकारी संघ यांनी १७ मे रोजी  माजी विद्यार्थी स्नेह सोहळा आयोजित केला होता. या स्नेहसोहळ्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक, कृषी व पत्रकारिताच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुनश्च विद्यार्थी जीवनाचा मनमुराद आनंद अनुभवला. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालया विषयी आपल्या भावना  व्यक्त केल्या. महाविद्यालयाचा झालेला विकास व प्रगती याबद्दल माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. खडतर परिस्थितीतून वाटचाल करत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याचे कार्य महाविद्यालयाने केले असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी नमूद केले. महाविद्यालयाच्या  सर्वांगीण प्रगतीकरिता आवश्यक असणारे सर्व प्रकारचे सहकार्य व योगदान माजी विद्यार्थी कल्याणकारी संघ व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी देत आहेत.

 मा. सर्जेराव पाटील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व अध्यक्ष, माजी विद्यार्थी कल्याणकारी संघ, यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या स्थापनेचा इतिहास, महाविद्यालयाच्या विकासासाठी नागरिकांनी दिलेली योगदान याची माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवार पी.जी. हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये त्यांनी महाविद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून समाजातील वंचित व दुर्बल विद्यार्थ्यांना  माजी विद्यार्थ्यांनी जे शक्य असेल ते सहकार्य करण्याचे आवाहन केले.

या स्नेह सोहळ्यास श्रीमती रश्मी कोठावळे, नगराध्यक्ष मलकापूर नगरपरिषद, माजी विद्यार्थी कल्याणकारी संघाचे उपाध्यक्ष मा. शिवाजी पाटील

 खजिनदार मा. चौगुले अनिल  तसेच कार्यकारिणीचे सदस्य मा. भारत पाटील,मा.

मा.विजय पाटील, मा. अजित मोरे, मा. श्रीमती गिरीजा कोकरे - देसाई, मा. श्रीमती कलावती संसारे हे उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत व परिचय प्रा.डॉ. कदम मुकुंद यांनी केले. उपप्राचार्य  प्रा. डॉ. पोरे एस. बी. यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. खबाले आर.बी.यांनी केले.

No comments:

Powered by Blogger.