कुपवाडमध्ये २०० किलो गांजा जप्त; पोलिसांचा थरारक पाठलाग, सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई.
कुपवाडमध्ये २०० किलो गांजा जप्त; पोलिसांचा थरारक पाठलाग, सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई.
______________________प्रतिनिधी : राजू कदम
------------------------------
सांगली जिल्ह्यातील कुपवाड शहरात पोलिसांनी धाडसी कारवाई करत तब्बल दीडशे ते दोनशे किलो गांजाची वाहतूक करणारी आलिशान इनोवा चारचाकी कार पकडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक (एलसीबी) आणि एमआयडीसी कुपवाड पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे मोठा अमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला असून, पोलिसांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सांगली एलसीबीला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला. संशयित इनोवा कारचा पाठलाग सुरू होताच आरोपींनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र एलसीबी पथकाने तत्काळ एमआयडीसी कुपवाड पोलिसांना माहिती दिली.
एमआयडीसी कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी तातडीने पथकासह कारवाई करत हनुमाननगर परिसरात संशयित वाहन अडवले. थरारक पाठलागानंतर अखेर गांजाने भरलेली आलिशान कार पोलिसांच्या ताब्यात आली.
या कारवाईदरम्यान पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे हे पायाला दुखापत होऊन जखमी झाले आहेत. जीवाची पर्वा न करता अमली पदार्थ माफियांविरोधात उभी ठाकलेली पोलिस यंत्रणा पाहून नागरिकांकडून पोलिस दलाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
सांगली एलसीबी आणि एमआयडीसी कुपवाड पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले असून, पुढील तपास सुरू आहे.

No comments: