आनंदीला व्हायचं आहे इंजिनिअर ! दहावीच्या परीक्षेत प्राप्त केले ९८.२० टक्के गुण.
आनंदीला व्हायचं आहे इंजिनिअर ! दहावीच्या परीक्षेत प्राप्त केले ९८.२० टक्के गुण.
--------------------------------अचलपूर : एका शेतकरी कुटुंबातील आनंदीने वर्ग १० वी च्या परीक्षेत ९८. २० टक्के गुण प्राप्त केले असून तिला इंजिनिअर व्हायचे आहे. तालुक्यातून प्रथम येणाऱ्या मुलींमध्ये आनंदीचाही समावेश आहे.
तिला पुष्पगुच्छ देऊन आणि पेढ वाटून पुढील शिक्षणासाठी प्रेरणा देत अभिनंदन केले. यावेळी तिची आई अश्विनी आणि आजी उपस्थित होत्या. शहरातील रायपुरा येथील रहिवाशी गणेश तट्टे एक शेतकरी आहेत. त्यांची मुलगी आनंदीने अभ्यासाचे योग्य नियोजन करून पहिली येण्याचा सन्मान प्राप्त केला. तिला गणित विषयात १०० गुण, इंग्रजी विषयात ९९ गुण आणि विज्ञान तंत्रज्ञान विषयात ९८ गुण मिळाले. सर्वच विषयात तिला भरघोस गुण मिळाले आहे. याप्रसंगी गुरुदेव जाणे, ललित खुजे, विजय वानखडे, विनोद तट्टे, प्रा. गणेश खापरे, संजय तट्टे, हरिश्चंद्र खुजे, सुभाष खापरे,उपस्थित होते.

No comments: