Header Ads

"लोणी देवकरमध्ये विकासाचा नवा अध्याय; शिंदे उद्योग समूहाच्या नव्या व्यवसायाचे जयदादा पवार यांच्या हस्ते भव्य उद्घाटन"

 "लोणी देवकरमध्ये विकासाचा नवा अध्याय; शिंदे उद्योग समूहाच्या नव्या व्यवसायाचे जयदादा पवार यांच्या हस्ते भव्य उद्घाटन"

-----------------------------------
प्रतिनिधी : गणेश धनावडे.
--------------------------------

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे शिंदे उद्योग समूहाच्या नव्या व्यवसायाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. २८ मे) हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना देणारा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भव्य उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व युवा नेते जयदादा अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तर माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मधुकर भरणे, डी. एन. जगताप, दीपक जाधव, दिलीप भिसे, प्रदीप जगदाळे, बाळासाहेब ढवळे, संदेश देवकर यांच्यासह इंदापूर, बारामती व दौंड तालुक्यातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, सरपंच, सदस्य, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.

हॉटेल जोगेश्वरी शेजारी आयोजित या कार्यक्रमाचे नियोजन उद्योजक अशोक शिंदे व सुरेश शिंदे यांनी केले होते. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भव्य स्वरूप दिले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना जयदादा पवार म्हणाले, “ग्रामीण भागात उद्योग उभे राहणे ही काळाची गरज आहे. शिंदे परिवाराने घेतलेले हे धाडसी पाऊल निश्चितच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करेल. तरुणांनी नोकरीबरोबरच व्यवसाय क्षेत्रातही पुढे यावे.”

नवीन उद्योगामुळे परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

हजारो नागरिकांच्या साक्षीने पार पडलेला हा सोहळा लोणी देवकरच्या विकासाच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिंदे परिवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

“उद्योगातून विकास, विकासातून रोजगार” हा संदेश देणारा शिंदे उद्योग समूहाचा हा नवा उपक्रम परिसराच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

No comments:

Powered by Blogger.