Header Ads

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात राधानगरीतील औषध दुकानदारांचा बंद

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात राधानगरीतील औषध दुकानदारांचा बंद

देशव्यापी संपाला उत्स्फूर्त पाठिंबा; दीडशेहून अधिक दुकाने राहिली बंद.




 प्रतिनिधी विजय बकरे.

----------------------------

राधानगरी तालुक्यातील औषध दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एक दिवस दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदवला. याबाबतची माहिती राधानगरी तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष सावंत यांनी दिली.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सुरू असलेल्या ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ बंदी घालावी, तसेच पारंपरिक छोट्या औषध विक्रेत्यांच्या व्यवसायाचे संरक्षण करावे, या प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील औषध दुकानदारांनी हा संप पुकारला होता. या आंदोलनाला राधानगरी तालुक्यातील औषध विक्रेत्यांनीही मोठा पाठिंबा दर्शविला.

तालुक्यातील दीडशेहून अधिक औषध दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. तसेच अनेक दुकानदारांनी काळ्या फिती लावून शासनाच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे छोट्या व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून भविष्यात व्यवसाय टिकवणे कठीण होईल, अशी भावना यावेळी औषध विक्रेत्यांनी व्यक्त केली.

या आंदोलनामुळे तालुक्यातील बहुतांश औषध दुकाने बंद असल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.

No comments:

Powered by Blogger.