Header Ads

पुसद मधील विविध सामाजिक संघटने तर्फे मा. ऍड. आशिष देशमुख यांचा सत्कार......

 पुसद मधील विविध सामाजिक संघटने तर्फे मा. ऍड. आशिष देशमुख यांचा सत्कार......

------------------------------------------
सिद्धार्थ कदम पुसद तालुका प्रतिनिधी.
------------------------------------------
पुसद मधील विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या संघटने तर्फे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा मधुन सतत तीन वेळा निवडणूक जिंकून हॅट्रिक करणारे पुष्पावंती नगरीचे सुपुत्र ऍड. मा. श्री आशिषभाऊ देशमुख यांचा सत्कार दिनांक 16 जुन रोजी सकाळी 8 वाजता माणुसकीची भिंत सोशल फॉउंडेशन उपजिल्हा रुग्णालय येथे घेण्यात आला. सर्वप्रथम गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळेस व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष  कृषिभूषण तसेच मोक्षधाम पुसदचे अध्यक्ष श्री दिपकभाऊ आसेगावकर होते.  सत्कारमूर्ती ऍड. श्रीआशिषभाऊ देशमुख, प्रा.श्री नंदकुमार खैरे, जेष्ठ पत्रकार श्री ललित सेता, आदर्श शेतकरी श्री दत्तात्रय जाधव, मिशन ग्रीनचे अध्यक्ष श्री रमेश डंबोळे हे होते. सर्व प्रथम प्रमुख पाहुण्यांचे हस्ते राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर पाहुण्यांचे स्वागत विविध सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले. नंतर सामाजिक संघटनेचे वतीने मा.ऍड.श्री आशिषभाऊ देशमुख यांचा सत्कार शाल, वृक्ष व संविधान देऊन करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना ऍड आशिष भाऊ यांनी बार कौन्सिल मध्ये सदस्य का व्हावं असे वाटले या बाबत माहिती दिली तसेच मागील त्यांच्या काळात केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली तसेच पुसद मधील विविध सामाजिक संघटना एकत्र येऊन करीत असलेल्या कामाचे कौतुक केले.या कार्यक्रमातच सामाजिक संस्थेकारिता विशेष काम करणारे ऍड. नितीन जाधव तसेच मिशन ग्रीनचे उपाध्यक्ष श्री पवन बोजेवार व रुग्णमित्र फॉउंडेशनचे श्री शांतिसागर इंगोले यांनी नुकतीच विधिज्ञ् हि पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सुद्धा एक रोपटं देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिपकभाऊ आसेगांवकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व संघटनानी एकत्र येऊन पुसद मध्ये एक मोठी सामाजिक चळवळ सुरु करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. श्री पवन बोजेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामगीताचार्य श्री गणेश धर्माळे सर यांनी केले. या कार्यक्रमामध्ये खालील सामाजिक संघटनानी सहभाग घेतला होता.माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशन, पुसद,मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था, पुसद, वसुंधरा बहुउद्देशीय संस्था, पुसद,रुग्णमित्र फाऊंडेशन पुसद,नाम फाऊंडेशन, पुसद,रोटरी क्लब, पुसद,संवेदना सोशल फाऊंडेशन, श्रीरामपूर,गीताई केंद्र, पुसद,लायन्स क्लब, पुसद,पुसद सेवा फाऊंडेशन,आरोग्यम् धनसंपदा सायकल ग्रुप,ज्ञानदीप अकॅडमी, पतंजली योग समिती, पुसद,गुरुदेव सेवा मंडळ व पुसद परिसरातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Powered by Blogger.