Header Ads

ओतूर: 'पोलीस काका' उपक्रमांतर्गत शिवनेरी विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर व पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन.

 ओतूर: 'पोलीस काका' उपक्रमांतर्गत शिवनेरी विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर व पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन.

-------------------------------- 

ओतूर प्रतिनिधी

-------------------------------- 

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'पोलीस काका' या उपक्रमांतर्गत ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील धोलवड येथील शिवनेरी विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल व अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या संकल्पनेतून तसेच जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम घेण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिनेश साबळे, संपत भालेकर व विश्वास केदार यांनी विद्यालयास भेट दिली. 

यावेळी विद्यार्थ्यांना वाढते सायबर गुन्हे, मोबाईलचा अतिवापराचे दुष्परिणाम आणि पोक्सो कायद्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे समुपदेशनही करण्यात आले. 

'पोलीस काका' म्हणून पोलीस हवालदार दिनेश साबळे यांचा संपर्क क्रमांक विद्यार्थ्यांना देण्यात आला असून, कोणतीही अडचण आल्यास त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले. 


विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी व त्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजगीरे यांनी बोलताना सांगितले.

No comments:

Powered by Blogger.