Header Ads

८७% भरले धरण; रात्रीपासून १,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

८७% भरले धरण; रात्रीपासून १,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
राधानगरी | प्रतिनिधी : विजय बकरे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पश्चिम घाटात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने राधानगरी धरणाची घोडदौड सुरूच ठेवली आहे. धरण आता तब्बल ८७ टक्के भरले असून, पूर्ण क्षमतेसाठी फक्त ६ फूट पाण्याचीच गरज उरली आहे. त्यामुळे राधानगरी धरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

धरणातील पाण्याची आवक वेगाने वाढत असल्याने बुधवारी रात्री १० वाजल्यापासून पावर हाऊसमधून १,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भोगावती नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

सध्या धरणाची पाणीपातळी ३४१.२० फूट, तर जलसाठा ७२०४.५७ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. सातही स्वयंचलित दरवाज्यांजवळ पाणी पोहोचल्याने धरण पूर्ण क्षमतेच्या अगदी उंबरठ्यावर आले आहे.

गेल्या १२ तासांत १४३ मिमी, तर १ जून ते २३ जुलै २०२६ या कालावधीत २,२६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने पश्चिम घाटात आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने येत्या काही दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

🔴 एका नजरेत

💧 धरण भरले : ८७%

📏 पूर्ण क्षमतेसाठी बाकी : अवघे ६ फूट

🌊 पावर हाऊसमधून विसर्ग : १,४०० क्युसेक

⚠️ भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

🌧️ १२ तासांत पाऊस : १४३ मिमी

📊 हंगामातील एकूण पाऊस : २,२६३ मिमी

No comments:

Powered by Blogger.