Header Ads

रा. मं. पाटील कुमार व कन्या विद्या मंदिर येथे स्व. कै. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

रा. मं. पाटील कुमार व कन्या विद्या मंदिर येथे स्व. कै. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

------------------------------

पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे रा. मं. पाटील कुमार व कन्या विद्या मंदिर,येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक मा. तानाजी जगताप यांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. शरद पाटील यांनी केले.

यावेळी मा. जावळे सर यांनी विद्यार्थ्यांना स्व. अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवासाची, सामाजिक व राजकीय कार्याची तसेच त्यांच्या कार्यशैलीची सविस्तर माहिती दिली. "कोणतेही काम हाती घेतल्यास ते पूर्णत्वास नेण्याचा दृढ निश्चय ठेवावा," असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी मा. सुभाष देसाई यांनी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटो ओळ :

रा. मं. पाटील कुमार व कन्या विद्या मंदिर, कसबा ठाणे येथे स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक मा. तानाजी जगताप यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.