Header Ads

गोरसेनेचा राज्यमंत्र्यांना आव्हान! मा. वसंतराव नाईकांच्या तालुक्यामध्ये दुर्लक्ष नको! 15 दिवसांची मुदत, अन्यथा नाईक बंगल्यासमोर ठीया.

 गोरसेनेचा राज्यमंत्र्यांना आव्हान! मा. वसंतराव नाईकांच्या तालुक्यामध्ये दुर्लक्ष नको! 15 दिवसांची मुदत, अन्यथा नाईक बंगल्यासमोर ठीया.

--------------------------------------

पुसद तालुका प्रतिनिधी

सिद्धार्थ कदम 

--------------------------------------

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, *स्व. मा. वसंतराव नाईक साहेब* यांच्या कर्मभूमी पुसद तालुक्याच्या विकासाकडे शासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाच्या आज *गोरसेना, पुसद तालुका* च्या वतीने राज्यमंत्री *मा. श्री. इंद्रनील नाईक साहेब* यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी गोरसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, "वसंतराव नाईक साहेबांनी घडवलेल्या पुसद तालुक्यात आजही मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. आमच्या 7 मागण्या या फक्त कागदावरील नसून लाखो शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या भावनेशी जोडलेल्या आहेत."


*गोरसेनेच्या 7 प्रमुख मागण्या:*

1. *पुसधरण धरणाच्या बांधावरील "वसंत सागर" हे ऐतिहासिक नाव तात्काळ पुनर्जीवित करावे.*

2. *कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारास "वसंतराव नाईक कृषी उत्पन्न बाजार समिती" असे नामकरण करावे.*

3. *चोंडी येथील वसंतराव नाईक स्मारकाच्या जागेचा शासकीय ठराव तातडीने मंजूर करावा.*

4. *उपजिल्हा रुग्णालयाच्या गेटलगत असलेल्या "नायक काशिनाथ" फलकास शासकीय मान्यता द्यावी.*

5. *शिळोना लगत असलेल्या भलंगवाडी तलावाचे खोलीकरण करून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी.*

6. *मांजर जवळा ते वाघजाळी हा रस्ता तात्काळ मंजूर करून काम सुरू करावे.*

 *इंजिनियर कॉलेजच्या पाठीमागील मुलतानवाडी गावाला सभागृह व हप्सीची सुविधा उपलब्ध करून द्यावी.*


 वरील सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून *पुढील 15 दिवसांच्या आत* लेखी आदेश निर्गमित करावेत. अन्यथा *गोरसेना* रस्त्यावर उतरेल. आमच्या भावना दुखावल्या गेल्यास *गोरसेनेचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते राज्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानासमोर ठीया मांडून उपोषण करण्यास भाग पडतील*, याची शासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी. अशी निवेदन राज्यमंत्री इंद्रानिल नाईक यांना देण्यात आले 


निवेदन देताना गोरसेनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.