मलकापूर एस.टी. आगाराच्या ताफ्यात ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते लोकार्पण
मलकापूर एस.टी. आगाराच्या ताफ्यात ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते लोकार्पण.
मलकापूर (प्रतिनिधी):शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय व्हावी तसेच विद्यार्थ्यांना शाळेत आणि महाविद्यालयात जाण्यासाठी वेळेत एसटी बस उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मलकापूर एस.टी. आगारास ५ नवीन “राजमाता जिजाऊ” बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसेसचा भव्य लोकार्पण सोहळा जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
लोकार्पण सोहळ्यानंतर या सर्व नवीन बसेस नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी तत्काळ सुपूर्द करण्यात आल्या. ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक बळकट आणि सुरळीत करण्यासाठी या बसेस अत्यंत उपयुक्त ठरतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी जनसुराज्य शक्तीचे कोल्हापूर जिल्हा परिषद गटनेते सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर), जिल्हा परिषद सदस्या स्नेहल केतन वेल्हाळ, माजी सभापती सुभाष इनामदार, बाळासाहेब गद्रे, शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती प्रियांका तानाजी भोसले, उपसभापती अमरसिंह खोत, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, मलकापूरच्या नगराध्यक्षा रश्मी शंतनू कोठावळे, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, रंगराव खोपडे आणि भाई भारत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच मलकापूर आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे, स्थानक प्रमुख शुभांगी धनवडे, वर्कशॉप प्रमुख सुप्रिया जाधव, सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रशांत लकेश्री यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: