Header Ads

दुर्गम डोंगररांगांतील विद्यार्थ्यांसाठी दातृत्वाचा हात; शैक्षणिक साहित्य वाटपातून शिक्षणाला नवे बळ.

 दुर्गम डोंगररांगांतील विद्यार्थ्यांसाठी दातृत्वाचा हात; शैक्षणिक साहित्य वाटपातून शिक्षणाला नवे बळ.

----------------------------------

शाहुवाडी  प्रतिनिधी 

 आनंदा तेलवणकर

मो.9404477703

----------------------------------

शाहुवाडी : शिक्षण हेच परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, या भावनेतून दुर्गम डोंगररांगांमध्ये वसलेल्या विद्या मंदिर कांटे येथील विद्यार्थ्यांसाठी स्वामी समर्थ फाउंडेशन, कोल्हापूर तसेच विविध दानशूर व्यक्तींनी शैक्षणिक साहित्याचे उदार हस्ते वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. या उपक्रमामुळे गरजू, निराधार आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून त्यांच्या शिक्षणाला नवे बळ मिळाले आहे.

या उपक्रमांतर्गत स्वामी समर्थ फाउंडेशन, कोल्हापूर यांनी ७ डझन बॉक्स वह्या आणि ७ डझन चार रेघी वह्या, श्रीमती स्नेहल विलासराव पेडणेकर (अधिव्याख्याता, गट व वर्ग-२ अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर) यांनी ७ डझन दुहेरी रेघी वह्या, सौ. ज्योती राजाराम सावंत यांनी २० लेखन पाट्या, तर श्री. सागर उबाळे (अध्यापक, विद्या मंदिर निकमवाडी) यांनी २० लेखन पाट्या भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मोलाची साथ दिली.

यावेळी स्वामी समर्थ फाउंडेशनचे संस्थापक श्री. जय पाटील यांनी, "शाळेतील कोणताही गरजू, निराधार अथवा अनाथ विद्यार्थी शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही," अशी ठाम ग्वाही दिली. फाउंडेशनचे सहकारी श्री. मयूर जाधव यांनीही भविष्यात शाळेला आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, नियमित अभ्यास, शिस्त, जिद्द आणि चिकाटी यांच्या बळावर जीवनात यश संपादन करण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील दानशूर संस्था व व्यक्तींनी अशाच प्रकारे पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. केशवराव गुरव यांनी केले. सूत्रसंचालन श्री. रोहित चौगले यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी श्रेयश चव्हाण याने केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुरेश पाटील, माजी अध्यक्ष श्री. विठ्ठल पाटील, गावचे पोलीस पाटील श्री. जगदीश पाटील, सदस्य श्री. सुनील पाटील, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने सर्व दानशूर संस्था व व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. समाजाने पुढे केलेला हा मदतीचा हात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशेचा किरण ठरत असून, ग्रामीण शिक्षणाला बळ देणारा आणि सामाजिक दातृत्वाची प्रेरणा देणारा हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास पात्र

No comments:

Powered by Blogger.