Header Ads

निकमवाडीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; वीजपुरवठ्याबाबत ग्रामस्थांमध्ये संताप.

निकमवाडीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; वीजपुरवठ्याबाबत ग्रामस्थांमध्ये संताप.

पन्हाळा:- पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथे विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, वीज वितरण व्यवस्थेबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निकमवाडी येथील दिलीप दौलू खोत हे रात्री घरालगत असलेल्या गोठ्यातील जनावरे अस्वस्थ होऊन ओरडत असल्याने पाहण्यासाठी गेले होते. गोठ्याचा दरवाजा उघडताच त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते जागीच कोसळले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान, वीजपुरवठा बंद करण्यासाठी डीपीकडे धाव घेण्यात आली. मात्र, तोपर्यंत दिलीप खोत यांचा मृत्यू झाला होता.

घटनेनंतर निकमवाडीतील अनेक नागरिकांनी शुक्रवारी रात्री गावातील काही घरांमध्येही विजेचा करंट जाणवत असल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर वीज वितरण यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

No comments:

Powered by Blogger.