Header Ads

चंद्र-शुक्र युतीचे विलोभनीय दर्शन; पश्चिम आकाशात खगोलप्रेमींची पर्वणी

 चंद्र-शुक्र युतीचे विलोभनीय दर्शन; पश्चिम आकाशात खगोलप्रेमींची पर्वणी.

~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिनिधी : उदय साळुंखे.

~~~~~~~~~~~~~~~~

आज रात्री सूर्यास्तानंतर पश्चिमेकडील आकाशात चंद्र आणि शुक्र ग्रहाची युती विलोभनीय पद्धतीने पाहायला मिळत आहे. चंद्राची सोनेरी कोर आणि तिच्या शेजारी तेजस्वी दिसणारा शुक्र ग्रह यामुळे आकाशाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.

हे खगोलीय दृश्य उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येत असून, चंद्राच्या कोरीसोबत चमकणारा शुक्र ग्रह पाहण्यासाठी नागरिक व खगोलप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात दिसणारा हा मनमोहक नजारा खगोलप्रेमींसाठी विशेष पर्वणी ठरत असून, अनेकांनी या सुंदर दृश्याचे छायाचित्र टिपण्याचा आनंद घेतला.

No comments:

Powered by Blogger.