Header Ads

गगनबावडा तालुक्यातील कोदे धरणावर बिअरच्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा ; पर्यटकांमुळे निसर्ग सौंदर्याला गालबोट.

 गगनबावडा तालुक्यातील कोदे धरणावर बिअरच्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा ; पर्यटकांमुळे निसर्ग सौंदर्याला गालबोट.

------------------------------------

कळे प्रतिनिधी 

 सुनिल मोळे 

९८९०९०८०४७

------------------------------------

*कळे :-* कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील निसर्गरम्य असलेले *कोदे धरण* पर्यटकांच्या गैरवर्तनामुळे कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे. येथे येणारे काही हौशी पर्यटक व राजकीय कार्यकर्ते ग्रुप पार्टी करून बिअरच्या बाटल्या आणि जेवल्यानंतरचे प्लास्टिक मोठ्या प्रमाणात तिथेच टाकून जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.


या धरण परिसराची दखल घेऊन प्रशासनाने येथे स्वच्छतेबाबत कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


दरम्यान, *श्री समर्थ बहुउद्देशीय संस्था, मरळीचे सदस्य व चौबल पुरस्कार प्राप्त समाजसेवक सुरेश नाईक (वॉटरप्रूफिंग स्पेशालिस्ट, रा. वाघुर्डे, ता. पन्हाळा) व महालक्ष्मी भिशी ग्रुप, कोल्हापूर* यांच्या वतीने धरणावरील कचरा आणि बिअरच्या बाटल्या जमा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.


यावेळी स्वच्छता मोहिमेत *दत्तात्रय खाडे, संग्राम पाटील, सागर काळे, बाळासो पाटील, बाळासो आडळकर, कृष्णात पाचकटे, अतुल पाचकटे, उत्तम तांबोळकर, प्रकाश तांबोळकर, शिवाजी शिखरे, पिंटू पाटील* यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


"समाजसेवा हीच ईश्वरसेवा. आम्ही कुठेही गेलो तरी तो परिसर प्लास्टिक मुक्त करतो. झाडे लावा, झाडे जगवा, हीच काळाची गरज आहे," असे आवाहन समाजसेवक सुरेश नाईक यांनी केले.

No comments:

Powered by Blogger.