दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफीचा GR डावलला - खाजगी शाळांची मनमानी शिक्षण मंत्र्यांना संध्या रणवीर यांचे निवेदन
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफीचा GR डावलला - खाजगी शाळांची मनमानी
शिक्षण मंत्र्यांना संध्या रणवीर यांचे निवेदन
----------------------------सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी.
--------------------------------
महागांव दि. 3 - राज्यातील 265 दुष्काळग्रस्त तालुक्यातील शालेय फी माफ करण्याचा शासन निर्णय झालेला असताना खाजगी व कॉन्व्हेंट शाळा तो डावलत असल्याचा प्रकार समोर आला आहे.त्याबाबत संध्या संदेश रणवीर यांनी शिक्षणमंत्री यांना निवेदनातून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.
शासन निर्णय दि. २५/०९/२०२६, मुद्दा क्र. ५ मध्ये शालेय हा शब्द असतानाही पहिली ते नववीच्या हजारो शेतकरी मुलांना सहामाही परीक्षेसाठी "पूर्ण फी भरा नाहीतर परीक्षेला बसू देणार नाही" अशी जबरदस्ती केली जात आहे. ह्यामुळे RTE कायदा 2009 व महाराष्ट्र फी विनियमन कायदा 2011 चे उल्लंघन होत असल्याचे दिसते या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई संदेश रणवीर यांनी ही गंभीर बाब शालेय शिक्षण मंत्री मा. दादा भुसे यांना निवेदनातून निदर्शनास आणून दिली आहे.
त्यांनी मागणी केली आहे की, १०वी १२वी प्रमाणेच १ली ते ९वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा व ३ महिन्याची मासिक फी माफ करण्याचा दुष्काळी स्थितीमुळे स्पष्ट आदेश काढावा आणि परीक्षे पासून कोणीही वंचित राहू नये असे निर्देश जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांना द्यावेत शालेय फी साठी अडवणूक करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी.अश्या मागण्या रणवीर यांनी केल्या आहेत

No comments: