Header Ads

शिक्षक मतदारसंघात तिरंगी रणसंग्राम!.

 शिक्षक मतदारसंघात तिरंगी रणसंग्राम!.

----------------------------------

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

 पी. एन. देशमुख, 

----------------------------------

नामांकनाचा आज अंतिम दिवस; तीनही महिला उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन.

अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, आज मंगळवारी नामांकन अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात तीनही प्रमुख महिला उमेदवार आपल्या समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अदिती पोहरे, शिक्षण संघर्ष संघटनेच्या संगीता शिंदे आणि युवास्वाभिमान पार्टीच्या अॅड. प्रीती हर्षल रेवणे या तीनही उमेदवारांकडून आज नामांकन दाखल केले जाणार आहे.

अदिती पोहरे या माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या असून, संगीता शिंदे या शिक्षण संघर्ष संघटनेच्या प्रमुख आहेत. तर अॅड. प्रीती रेवणे यांना युवास्वाभिमान पार्टीचे नेते रवी राणा यांनी उमेदवारी दिली आहे.

आजच्या नामांकनामुळे निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापणार असून, शिक्षक मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार याकडे संपूर्ण विभागाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.