Header Ads

पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी सुरू!

 पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी सुरू!

राधानगरी तालुक्यात ६ मतदान केंद्रांवर ८,५५९ मतदार; प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात.


राधानगरी (प्रतिनिधी, विजय बकरे) :

पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राधानगरी तालुक्यात निवडणुकीची लगबग वाढली आहे. तालुक्यातील १२२ गावांतील तब्बल ८,५५९ मतदारांसाठी सहा मुख्य मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली असून, प्रशासनाकडून आवश्यक तयारी वेगाने पूर्ण केली जात आहे.

तहसीलदार सौ. अनिता देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यात पदवीधर मतदारसंघासाठी ७,५३७, तर शिक्षक मतदारसंघासाठी १,०२२ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सहा केंद्रांवर मोठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत राहणार आहे.

सहा केंद्रांवर १५ बूथची व्यवस्था

तालुक्यातील मतदान केंद्रनिहाय बूथ व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे—

राधानगरी – २ बूथ

कसबा तारळे – २ बूथ

सरवडे – ३ बूथ

कसबा वाळवे – ३ बूथ

आमजाई वरावडे – २ बूथ

राशिवडे – ३ बूथ

अशाप्रकारे एकूण ६ मतदान केंद्रांवर १५ बूथची व्यवस्था करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी महसूल व निवडणूक विभागाकडून आवश्यक प्रशासकीय नियोजन करण्यात येत आहे. मतदान केंद्रांवरील व्यवस्था, मनुष्यबळ तसेच इतर आवश्यक बाबींची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे तहसीलदार सौ. अनिता देशमुख यांनी सांगितले.

८,५५९ मतदार, ६ केंद्रे आणि १५ बूथ यामुळे राधानगरी तालुक्यातील पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीकडे आता राजकीय व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.