Header Ads

वाढदिवसाचा जल्लोष सामाजिक बांधिलकीतून; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

 वाढदिवसाचा जल्लोष सामाजिक बांधिलकीतून; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

३२ हून अधिक रक्तदात्यांचे स्वेच्छेने रक्तदान; सामाजिक कार्यातून वाढदिवसाचा आनंद साजरा


सांगली:

माननीय केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मिरवणुकीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल ३२ हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक दायित्वाचे भान जपले.

वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष आणि उत्सव नव्हे, तर समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची संधी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. 'रक्तदान हेच श्रेष्ठदान' या भावनेतून रक्तदात्यांनी पुढाकार घेत गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या कार्यात आपले योगदान दिले.

रक्तदानासाठी नागरिकांनी दाखवलेला उत्साह, आयोजकांचे नियोजन आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे योगदान कौतुकास्पद ठरले.

वाढदिवसाचा उत्सव रक्तदानाच्या माध्यमातून; आनंदासोबत माणुसकीचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला!

No comments:

Powered by Blogger.