दुःखात ही जोपासले निसर्गा प्रति प्रेम... गादेवार परिवाराचा समाजा समोर एक नवा आदर्श...
दुःखात ही जोपासले निसर्गा प्रति प्रेम... गादेवार परिवाराचा समाजा समोर एक नवा आदर्श...
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
मिशन ग्रीन बहु उद्देशीय संस्थेचे सक्रिय सदस्य निखिल गादेवार यांचे वडील दिलीप दत्तात्रय गादेवार यांचे दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले होते. त्यांच्या अस्थी
नदीमध्ये विसर्जित करून नदीचे पाणी दूषित होऊ नये या करिता निसर्ग प्रेमी निखिल गादेवार व परिवाराने या अस्थी नदी मध्ये विसर्जित न करता त्यांच्या वडिलांची आठवण सदैव आपल्या सोबत राहावी व पर्यावरण संतुलन राहावे या करिता त्या अस्थीचे विसर्जन त्यांच्या शेतात खड्यामध्ये केले होते.आज दिनांक 20 ला सकाळी त्यांच्या शेतात त्या ठिकाणी सप्तखंजिरी वादक, समाज प्रबोधनकार आदरणीय पंकजपालजी महाराज, माणुसकीची भिंती चे अध्यक्ष गजानन जाधव,सचिव पंजाबराव ढेकळे,मिशन ग्रीनचे अध्यक्ष रमेश डंबोळे,उपाध्यक्ष पवन बोजेवार,सचिव किरण किनाके,सदस्य नयन रामधनी,कैलास गादेवार दीपाली तगलपल्लेवार (गादेवार ) यांच्या उपस्थिती मध्ये आंबा,फणस व जांभूळचे वृक्षारोपण करण्यात आले....या प्रसंगी सप्तखंजिरीवादक व समाज प्रबोधनकार पंकजपाल महाराज यांनी पुसदच्या नागरिकांना नद्या प्रदूषित होणार नाही या करिता गादेवार परिवाराचा आदर्श घेण्याचं आवाहन केले.

No comments: