Header Ads

ओतूर पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोरी टोळीचा पर्दाफाश, ५ लाखांच्या ९ दुचाकी जप्त.

 ओतूर पोलिसांची मोठी कारवाई : मोटारसायकल चोरी टोळीचा पर्दाफाश, ५ लाखांच्या ९ दुचाकी जप्त.

ओतूर (ता. जुन्नर) बातमी -प्रतिनिधी - कैलास बोडके :ओतूर पोलीस ठाणे हद्दीत वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा ओतूर पोलिसांनी छडा लावला असून, आरोपींकडून तब्बल पाच लाख रुपये किंमतीच्या एकूण ९ चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

दि.३१ऑक्टोबर रोजी ओतूर येथील चैतन्य विद्यालयासमोरील रस्त्यावरून दत्तात्रय बाळशिराम गिते  यांची डिस्कव्हर गाडी नं.एम. एच. १४ बी. एच. ६३६७  ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद ओतूर पोलिसांत दाखल करण्यात आली होती.

मोटारसायकल चोरीला आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ओतूर पोलीस स्टेशनला विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. हे पथक चोरीस गेलेल्या गाड्यांचा शोध घेत असताना ब्राह्मणवाडा-ओतूर रस्त्यावर तिघेजण डिस्कव्हर गाडी नं. एम. एच. १४ बी. एच ६३६७ वरून जाताना मिळून आले.

त्यांना थांबवून कागदपत्रे मागितली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ताब्यातील दुचाकी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी दिल्यानंतर अधिक तपासात त्यांनी त्यांचा साथीदार विशाल सुनिल ठोंगिरे रा. मुथाळणे ता. जुन्नर याच्या मदतीने आणखी ८ मोटारसायकल अकोले, संगमनेर, चाकण व ओतूर परिसरातून चोरल्याची कबुली दिली असून 

संदीप गोरक्षनाथ गडख रा. अकोले, जि. अहिल्यानगर

,वैभव विजय वावळे रा. बहिरवाडी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर

, दीपक कुमा उंबरे रा. मांडवे, ता. जुन्नर, जि. पुणे यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल , अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, संदीप आमणे, पोलीस हवलदार नरेंद्र गोराणे, दिनेश साबळे, महेंद्र पाटील, बाळशिराम भवारी, धनंजय पालवे, ज्योतीराम पवार, आशिष जगताप, श्यामसुंदर जायभाये, विशाल गोडसे, अतुल भेके यांनी केली आहे.

No comments:

Powered by Blogger.