भाजपा पदाधिकारी व वडगांव पोलीस महेश गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे 2 वर्षाच्या मुलाचे आई वडील सापडले.

 भाजपा पदाधिकारी व वडगांव पोलीस महेश गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे 2 वर्षाच्या मुलाचे आई वडील सापडले.

--------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

---------------------------

 पेठ वडगांव येथील तुकाईनगर येथे 2 वर्षाचा लहान मुलगा खेळत खेळत आला असता त्याला घरी परत जायचा रस्ता कळेना व बोलता ही येईना त्यामुळे रडू लागला त्यावेळी तुकाईनगर येथील रहिवासी यांनी तय्यब कुरेशी जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक मोर्चा यांना  फोन करून कळविले असता त्यांनी तात्काळ वडगांव पोलीस ठाण्यात संपर्क साधून पोलीस अधिकारी महेश गायकवाड यांना माहिती दिली व मुलाच्या पालकांचा शोध सुरू केला सोशल मीडिया माध्यमातून माहिती प्रसारित केली.

नुकतेच चार दिवसापूर्वी परराज्यातील दांपत्य रोजगार साठी वडगांव येथे राहावयास आले आहेत त्यांचा मुलगा असलेचे त्यांनी पोलीस ठाण्यात सांगितले असता पूर्ण चौकशी करून त्या लहान बाळाला आई वडिलांच्या स्वाधीन करणेत आले असता बाळाने झटक्यात आईला मिठी मारली व आईचे पाणावलेले डोळे स्मित हास्य मध्ये बदलले यावेळी दांपत्याने सर्वांचे आभार मानले यावेळी तय्यब कुरेशी ,पोलीस अधिकारी महेश गायकवाड,सलीम मुलाणी,दिनेश सनगर जावेद सय्यद,अमित कोळी,धोंडीराम वड्ड उपस्थित होते*

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.