शाहूवाडी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक
शाहूवाडी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक.
-------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनीधी
आनंदा तेलवणकर
मो . 9404477703
-------------------------------
शाहुवाडी :राज्य सरकारने मराठी आणि इंग्रजी शाळेमध्ये हिंदी ही तिसरी भाषा अनिवार्य केली आहे. याला विरोध म्हणून आज शाहूवाडी तालुका मनसेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असताना आणि आहेत त्या विषयांचा पोर्शन पुर्ण होत नसताना. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षक विद्यार्थी यांच्यावर अतिरिक्त ताण पडणार आहे आणि त्याचा परिणाम मराठी भाषेवर होणार आहे आगामी काळामध्ये आपली मातृभाषाच नामशेष होण्याचा धोका या निर्णयामुळे होणार आहे. तरी सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय शाहुवाडी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाहूवाडी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले सदर ठिकाणी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम, सतीश तांदळे, तालुका उपाध्यक्ष संदीप लाळे राहुल पाटील विभाग अध्यक्ष मिलिंद घोलप शाखा अध्यक्ष सचिन कांबळे कुणाल काळे आदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment