दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी .


--------------------------------------------------------
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील 
--------------------------------------------------------

शाहू महाराज हे जनतेच्या हृदयातले राजे होते होते
सौ.वैशाली पाटील*

चंदगड – "आरक्षण देणारा पहिला राजा, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, अंधश्रद्धा व कर्मकांडावर प्रहार करणारा आणि खऱ्या अर्थाने लोकहितवादी राजा म्हणजेच छत्रपती शाहू महाराज!" असे प्रतिपादन सौ. वैशाली पाटील यांनी केले.

त्या दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे आयोजित राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. पी. पाटील होते. प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी महाराजांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर ठेवला.

कार्यक्रमात कला शिक्षक व्ही. के. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुलांचे शाहू’ या विषयावर विद्यार्थ्यांनी साकारलेले छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले. तसेच ग्रंथपाल शरद हदगल यांनी शाहू महाराजांवर आधारित पुस्तकांचे आकर्षक ग्रंथ प्रदर्शन सादर केले.

कार्यक्रमात वर्षा पाटील, विद्या डोंगरे, व्ही. एस. मोहनगेकर, एस. व्ही. माळी, वर्षाराणी बुरुड, ओंकार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रविंद्र कांबळे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.