चालत्या दुचाकीच्या चाकात स्कार्फ अडकून डोक्यावर पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू.
चालत्या दुचाकीच्या चाकात स्कार्फ अडकून डोक्यावर पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू.

---------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी/ विजय कांबळे
---------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी -: सांगवडे मध्ये भाजीपाला विकून पोट भरणाऱ्या महिलेचा चालत्या दुचाकीच्या चाकात स्कार्फ अडकून डोक्यावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. सौ शारदा संजय मोरे (वय 49) असे मृत महिलेचे नाव आहे. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सांगवडे येथील संजय मोरे यांची पत्नी शारदा मोरे हे दोघे दुचाकीवरून सांगवडे वाडी येथील कुंडीमळा येथे नातेवाईकांनी ठेवलेल्या कार्यक्रमासाठी जात होते. ते सांगवडेवाडीला गाडीवरून जात असता गाडीवर डोक्यावरून मानेभोवती स्कार्फ बांधते वेळी गाडीच्या मागील चाकात स्कार्फ गुंडाळा व शारदा मोरे गाडीवरून खाली रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला खूप मार लागला होता. त्या अवस्थेत त्यांना कोल्हापूर मधील खाजगी दवाखान्यात तातडीने दाखल करण्यात आले. दाखल केले असता उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले.
Comments
Post a Comment