ॲड.विरेंद्र मंडलिकांचे कृतीतून राजर्षींना अभिवादन.

 ॲड.विरेंद्र मंडलिकांचे कृतीतून राजर्षींना अभिवादन.

---------------------------

मुरगूड प्रतिनिधी

जोतीराम कुंभार 

-----------------------------

शाहू महाराज वास्तव्यात असलेल्या इमारतीचे स्वखर्चातून रंगकाम करण्याचा घेतला निर्णय.

आजच कामकाजाला सुरुवात.

शाहू जयंतीनिमित्त मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप.

शिवसेना बहुजन विकास आघाडीचा उपक्रम.

छ.शाहू महाराजांचा ज्या इमारतीत सहा वेळा मुक्काम राहिला ती इमारत आज ग्रामीण रुग्णालयासाठी वापरली जाते. हेरिटेजचा दर्जा असलेल्या या इमारतीच्या रंगरंगोटीचे उर्वरीत काम स्वखर्चातून करण्याचा निर्णय घेत असून आजच या कामकाजाला सुरुवात करत असल्याची घोषणा शाहू जयंतीच्या निमित्ताने युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ॲड.वीरेंद्र मंडलिक यांनी केली.


मुरगूड येथे छ. शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ॲड. विरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते फळे वाटप व प्रतिमापूजन कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील होते. 


      ॲड. मंडलिक म्हणाले, " शाहू महाराजांचे समाजावर अनंत उपकार आहेत. विशेषता मुरगूडच्या विकासात त्यांचे फार मोठे योगदान आहे. मुरगूड चे ग्रामीण रुग्णालय येत्या काही दिवसात ५० खाटाचे होईल.त्यात प्रसुती शस्त्रक्रिया , डायलेसिस युनिट व अन्य गरजेच्या अद्यावत सुविधांनी परिपूर्ण रुग्णालय मुरगूड परिसराचे भूषण ठरेल."


मुरगूड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अमोल पाटील म्हणाले, "छ.शिवाजी महाराजांचे प्रतिरूप म्हणजे छ. शेतकऱ्यांना सिंचन , विद्यार्थ्यांना शिक्षण , महिलांना स्वातंत्र आणि समाजाला प्रबोधनाचा मार्ग दाखविणारे लोकराजे होते. 


स्वागत व प्रास्ताविक शिवसेनेच्या बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल सिध्देश्वर यांनी केले.

          यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, माजी नगरसेवक शिवाजीराव चौगले, डॉ. शिवाजी भुमरे, डॉ. रवींद्र कांबळे, डॉ. तानाजी कुंभार दीपक शिंदे, सर्जेराव अवघडे, दत्ता मंडलिक, अक्षय शिंदे, मोहन कांबळे, संभाजी आंगज, अनिल राऊत, शिवभक्त सर्जेराव भाट, सर्जेराव पाटील, सचिन भारमल, राजू कांबळे, विक्रम गोधडे, युवराज लाटकर, पांडूरंग गायकवाड, तानाजी दळवी, गणपती पुजारी ,विनायक साठे ,सुरेखा कांबळे ,रूपाली पाटील , बाजीराव पाटील , राजेंद्र कुंभार ,यशवंत कांबळे, नागेश गिरी ,संजय जिरगे, बाबासाहेब कांबळे , अनिल कांबळे , भिकाजी कांबळे, सूर्यकांत डवरी यांच्यासह बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

        ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.