कुंभोज तालुका हातकलंगले येथील मानाचे असणाऱ्या कुंडले महाराज दिंडीचे आषाढी वारीसाठी आळंदी पंढरपूरकडे प्रयान.
कुंभोज तालुका हातकलंगले येथील मानाचे असणाऱ्या कुंडले महाराज दिंडीचे आषाढी वारीसाठी आळंदी पंढरपूरकडे प्रयान.
---------------------------------------------------
फ्रंट लाईन महाराष्ट्र
कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे
-----------------------------------------------
आषाढी वारीच्या काळात कुंभोज सह ग्रामीण भागातून वारकरी दिंड्यांमध्ये एकत्र येऊन पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. ही परंपरा गेले पंचवीस वर्षांची असून, वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी एकादशीसाठी आज रवाना झाले. दिंडीमध्ये भजन, कीर्तन, टाळ-मृदुंगाचा गजर आणि भगव्या पताकांसह चालणारे वारकरी तसेच संतांच्या पादुका किंवा मूर्ती घेऊन महिला वारकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
कुंडले महाराज चॅरिटेबल ट्रस्ट कुंभोज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आषाढी पायी दिंडीच्या निमित्ताने. कुंडले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभोज येथून पंढरपूर येथे पायी दिंडी ची सुरुवात आज करण्यात आली. यावेळी एसटी स्टँड परिसरात रिंगण सोहळा संपन्न झाला.यावेळी कुंडले महाराज, शितल कळंत्रे, रावसाहेब पुरस्कार सुभाष देवमोरे ,ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच माधुरी घोदे, जयश्री जाधव, शुभांगी माळी, रविराज जाधव आनंदा माळी तसेच गावातील २०० पेक्षा जास्त वारकरी उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज

No comments: