परशुराम चषक क्रिकेट स्पर्धा कमिटी व ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम, कोल्हापूर यांच्या वतीने दुर्गम भागातील गरजू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वाटप.
परशुराम चषक क्रिकेट स्पर्धा कमिटी व ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम, कोल्हापूर यांच्या वतीने दुर्गम भागातील गरजू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वाटप.
--------------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
मो .9404477703
--------------------------------------
परशुराम चषक क्रिकेट कमिटी व ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, कोल्हापूर यांच्या वतीने दुर्गम भागातील गरजू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. शाहूवाडी तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल भागातील कांटे, बुरंबाळ, बर्की, बर्की धनगरवाडा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीच्या स्कुल बॅग व दर्जेदार शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. शैक्षणिक सत्राच्या सुरवातीला मिळालेले हे साहित्य गरजू विद्यार्थ्यांना खूपच उपयुक्त ठरत आहे. त्यांच्या या महत्वपूर्ण शैक्षणिक मदतीबद्दल विदयार्थी व पालक वर्गातून आभार व्यक्त होत आहेत यावेळी केदार वाघापूरकर, प्रणव निगुडकर, श्रीधर कुलळळी, वैभव मोडक, मनोज जोशी, अक्षय भिडे, विनोद धुपकर, समर्थ दंडगे, आदित्य कुलकर्णी, उदय शिंदे आदी उपस्थित होते
उपस्थित सर्वांचे आभार उमेद सदस्य दशरथ आयरे यांनी व्यक्त केले
Comments
Post a Comment