सरकारी योजनांच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित ?
सरकारी योजनांच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित ?

--------------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)
--------------------------------------------
सरकारकडून विविध योजना जाहीर केल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरकुल, महिला सक्षमीकरण, कृषी विकास इत्यादींसाठी. मात्र अनेक वेळा या योजनांचा लाभ खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचत नाही. त्यामागे अनेक कारणं असतात.ती प्रमुख कारणे शोधण्याचे काम शासकीय यंत्रणेंना करणे गरजेचे असून, जोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा सर्व सामान्याला या योजना समजावून सांगणार नाही तोपर्यंत ह्या योजनांचा लाभ सर्व सामान्य नागरिकांना घेता येणार नाही,
परिणामी सदर योजना राबवत असताना अनेक एजंटांची संख्या वाढली असून सदर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सदर एजंटांच्या मार्फत सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जाते पण ना मी त्यामध्ये शासकीय यंत्रणेतील ही काही अधिकारी सामील असून सदर अधिकारी एजंटांच्या मार्फत सदरील योजना मिळवून देण्यासाठी काही प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याची चित्र सध्या हातकणंगले तालुक्यात दिसत आहे.
ग्रामीण भागातील काही नागरिकांना सदर योजना कधी चालू होतात हे माहिती असते त्यामुळे सदर नागरिक योजना चालू होताच आपला लाभ उठवतात, परिणामी प्रत्येक वर्षी लाभ घेणाऱ्यांची संख्या एकाच कुटुंबात अथवा एकाच समाजातील ठराविक नागरिकांनाच मिळत असल्याचे चित्र दिसत आहे परिणामी शासकीय अधिकारी सदर योजना मंजूर होताच आपल्या जवळच्या बगलबच्च्यांना सदर योजनेची माहिती देऊन अर्ज प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्याच्या सूचना करतात व सदर योजना त्यांनाच मंजूर होते .परिणामी सदर योजना अर्ज प्रस्ताव दाखल करत असताना ते ऑनलाईन पद्धतीने करण्याची आठ शासनाने घातली असल्याने अनेक सामान्य नागरिकांना सदर योजना माहिती असूनही त्या योजनेचा लाभ घेता येत नाही , याला जबाबदार कोण सरकारने सदर योजना राबवत असताना सर्वसामान्य नागरिकाला त्या सहजासहजी मिळवता यावा यासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा पुरवाव्यात व योजना पुरवत असताना मध्यस्थीच्या रूपाने काम करणारी एजंट व पैसे घेऊन काम करणारे भ्रष्ट अधिकारी यांना बाजूला सारून सदर योजना सर्वसामान्य नागरिकापर्यंत डायरेक्ट पोहोचवता येईल त्याची सोय करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment