लेआउट, फार्म हाऊस आणि मर्सडीज वाल्यांना कर्जमाफी नाही खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे.
लेआउट, फार्म हाऊस आणि मर्सडीज वाल्यांना कर्जमाफी नाही खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे.
---------------------------------
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
पी एन देशमुख. .
---------------------------------
अमरावती. ( कौंडण्यपूर ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. आता अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. ले आऊट वाल्यांना, फार्म हाऊस वाल्यांना कर्ज काढून मर्सडीज घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. अमरावतीच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लाडक्या बहिणीसाठी जो महिना १५00 रुपये सुरू केला होता, तो तो पुढच्या काळात लाडक्या बहिणींना २१00 रुपये देणार आहोत आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की, शेतकऱ्यांना पुढील५ वर्षा त शेतात विजेचे बील देणार नाही तसेच आमच्या सरकारने सांगितली की खऱ्याखऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सडीज घेतल्या, ज्यांचे लेआउट आहेत फार्म हाऊस साठी कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी भेटणार नाही. धन डांग्यांना कर्जमाफी नको ज्यांना गरज आहे त्यांना कर्ज माफी मिळायला हवी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे. अधिवेशन काळात ती समिती घोषित करू अशी त्यांनी स्पष्ट केले. येत्या ३ तारखेला४ वाजता पासून रात्री १0 वाजेपर्यंत बच्चू कडू यांच्यासोबत विधानभवनात बैठक लावली आहे. माझ्या दालण्यात बैठक लावली आहे. या बैठकीत ८ते१0 मंत्री सोबत असतील तेव्हा महत्त्वाच्या निर्णयाचे शासन निर्णय होतील असे बावनकुळे यांनी म्हटले आहे दरम्यान राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कार्यक्रम आणि वेळ पत्रक निश्चित करण्यात आले असून ३0 जून ते १८ जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात विरोधी पक्ष हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून शक्तीपीठ महामार्ग तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफी वरून सरकारला चांगलेच घेरू शकतात.
Comments
Post a Comment