स्त्रियां आर्थिक सक्षम बनल्या खेरीज त्यांचा विकास नाही
स्त्रियां आर्थिक सक्षम बनल्या खेरीज त्यांचा विकास नाही.. प्रा. बी. जी. मांगले.
----------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी / विजय कांबळे
----------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी-: "स्त्रियांनी शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रात जर मुशाफिरी केली तरच त्यांचा खऱ्या अर्थाने विकास झाला असं म्हणता येईल"
राजर्षी शाहू जयंतीच्या निमित्ताने वळीवडे तालुका करवीर या ठिकाणी जागर फाउंडेशन, कोल्हापूर आयोजित महिला सबलीकरणाचा कार्यक्रम जोरदार यशस्वी झाला. प्रथम गडमुडशिंगी गावच्या सरपंच...... आणि वळीवडे गावच्या सरपंच सौ कुसाळे आणि सुबराव पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ आशा गुरव यांनी केले.
यावेळी बोलताना प्रा.मांगले म्हणाले,स्त्रियां आर्थिक सक्षम बनल्या खेरीज त्यांचा विकास नाही.
"शासनाच्या मदतीवर अवलंबून राहून विकास होणार नाही. त्याने महिला पंगु होतील. त्यासाठी शिक्षण घेऊन स्वकर्तृत्वावर आर्थिक स्वावलंबन मिळवावे लागेल. तरच ग्रामीण भागातील महिलांचा विकास होईल."यावेळी करवीर तालुका सहाय्यक निबंध श्री प्रेमदास राठोड यांचे राजर्षी शाहू जागर पुरस्कार वितरण झाले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये बचत गटाच्या महिलांना पतसंस्था नोंदणी करणेसाठी शासनाने बऱ्याच सवलती दिल्या असल्याचे सांगितले. तसेच अनेक महिलांनी यावेळी जागर फाउंडेशन ने महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात केलेल्या कामाचा प्रामुख्याने उल्लेख केला. गडमुडशिंगी सरपंच सौ अश्विनी शिरगावे यांनी आपल्या कारकिर्दीत महिला सरपंच या नात्याने केलेल्या विशेष कामांचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, "महिला सार्वजनिक क्षेत्रात वावरत तयार ही चांगली गोष्ट आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जरी महिला मोठ्या संख्येने बाहेर पडल्या तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास निश्चित होईल."
यावेळी मीनाक्षी नवले( क्रांती प्रभात संघाचे अध्यक्ष) म्हणाल्या मी अठरा वर्षे लग्नानंतर घरी होते आणि त्यानंतर ,"मी उमेद च्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले. त्यामुळे सर्व महिलांना शासकीय योजना असतील किंवा सामाजिक कामे असतील या माध्यमातून आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात सक्रिय होऊन स्वतःचा विकास साधता येऊ शकतो. तसेच वळिवडेच्या सरपंच सौ रूपाली कुसाळे यांनी देखील आपले अनुभव कथन केले. सर्व वक्त्याने राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख करत जयजयकार केला.
यावेळी गांधीनगर सेवा रुग्णालय केंद्राचे डॉ. दिलीप वाडकर, वंचित बहुजन आघाडीच्या आघाडीचे करवीर तालुकाप्रमुख भीमराव गोंधळी, गडमुडशिंगी सी.आर.पी सौ वैशाली गवळी, आशा गुरव, पुनम कांबळे अशा अनेक वक्त्याने आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमास वळीवडे व परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या. जागर फाउंडेशन च्या वतीने सौ. स्वाती चौगुले, आशा गुरव राजश्री जाधव, कमल जाधव, रेखा भोपळे,बचत गटाच्या महिलांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं
Comments
Post a Comment