शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस ओबीसी न्याय महासंमेलनाचे आयोजन
शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस ओबीसी न्याय महासंमेलनाचे आयोजन.
महाराष्ट्र प्रदेश महासचिव नंदकुमार कुंभार यांची माहिती
****************
इस्लामपूर प्रतिनिधी
*****************
शोषित, वंचित, गरजू आणि मागासवर्गीय समाजाच्या हक्कासाठी बुलंद आवाज उठवण्यासाठी काँग्रेस ओबीसी नेतृत्वाच्यावतीने काँग्रेस ओबीसी नेतृत्वाचा भागीदारी न्याय महासंमेलन आयोजित करण्यात येत आहे.हे महासंमेलन शुक्रवार २५ जुलै रोजी सकाळी १० वाजता तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेश महासचिव नंदकुमार कुंभार यांनी दिली.
नंदकुमार कुंभार म्हणाले , दिल्ली येथे होणाऱ्या महासंमेलनात राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे , लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत. राहुल गांधी यांनी सांगितले की "ज्याची जितकी संख्या, त्याची तितकी भागीदारी" सुनिश्चित केली जाईल. जातीय जनगणना केली जाईल; तसेच सुप्रीम कोर्टाच्या इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटल्यात ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून ती वाढवण्याची आवश्यकता आहे.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष ओबीसी विभाग भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली या महासंमेलनासाठी नोंदणी झालेले राज्यातून दहा हजार लोक स्व:खर्चाने जाणार आहेत.
तरी मागासवर्गातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा.या महासंमेलनात सहभागी होण्यासाठी आपले नाव, ठिकाण व मोबाईल क्रमांक प्रदेश अध्यक्ष ओबीसी विभाग भानुदास माळी मो. ९५८८६८९०६८ आणि काँग्रेस प्रदेश महासचिव नंदकुमार कुंभार मो. ९९०६०४४०५८५ या नंबर वर संपर्क करून नाव नोंदणी करावी.
Comments
Post a Comment