मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत माझा एक दिवस बळीराजा सोबत चार सुत्री भात लागवड पद्धत प्रशिक्षण.
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत माझा एक दिवस बळीराजा सोबत चार सुत्री भात लागवड पद्धत प्रशिक्षण.
----------------------------------
शाहुवाडी प्रतिनीधी
आनंदा तेलवणकर
मो .9404477703
----------------------------------
शाहुवाडी तालुक्यातील कांटे या गावात श्री आनंदा तेलवणकर यांच्या शेतावर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे मार्फत माझा एक दिवस बळीराजासाठी या कार्यक्रमांतर्गत भात लागण तंत्रज्ञान विषयी माहिती देण्यात आली यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले या तंत्रज्ञानामध्ये भात चिखलनिच्या वेळी गिरीपुष्प या वनस्पतीच्या पाल्याचा वापर नियंत्रित रोप लागवड तसेच युरिया ब्रिकेटचा वापर कसा करणे माती परीक्षण अहवालानुसार खताचा वापर तसेच शासनाच्या विविध योजना विषयी माहिती सांगण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी श्री सतीश तांदळे व उपकृषीआधिकारी सी आर सोनवणे सहाय्यक कृषी अधिकारी अनिल गुजले वर्षा भंडारी रेखा वळवी हे अधिकारी उपस्थित होते तसेच जगदीश विजय पाटील व सहादेव साळुंखे इत्यादी शेतकरी उपस्थित होते या सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून भात लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती घेतली व आनंदा तेलवणकर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
Comments
Post a Comment