महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 51 महा रक्तदान संकल्प.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 51 महा रक्तदान संकल्प.
--------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर महा रक्तदान संकल्प आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त भाजपा उत्तरेश्वर मंडल मध्ये या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते,त्यामध्ये एक्कावान रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
मा.देवेंद्रजी यांनी आज आव्हान केले होते की वाढदिवसानिमित्त कोणतेही बॅनर जाहिरात मोठा गाजावाजा न करता एक मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये शुभेच्छा रुपी आपले योगदान द्यावे व समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात यावा.त्याच आव्हानाला प्रतिसाद देत आज भाजपा उत्तरेश्वर मंडल मध्ये रक्तदान शिबिर पार पडले.
यावेळी उत्तरेश्वर मंडल अध्यक्ष सुनील पाटील, भरत काळे, अमेय भालकर, सुशांत पाटील, विराज चिखलीकर, अमित संकपाळ, राजू माने, श्रीकांत पाटील, संदीप पाटील, विशाल शिराळे, राहुल घाटगे, चेतन शिंगटे, दिग्विजय कालेकर, सुशांत मुधाळे, अजित मुळीक, या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment