घरांवर पाळत ठेवून घरफोडी करणाऱ्या चोरट्याच्यां कडून 24 तोळे सोन्याचे दागिने जप्त.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई .

 घरांवर पाळत ठेवून घरफोडी करणाऱ्या चोरट्याच्यां कडून 24 तोळे  सोन्याचे दागिने जप्त.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई .

-----------------------------------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर

 -----------------------------------------

वाई  तालुका, जिल्हा सातारा साक्षी हाईटस, सी 16 सह्याद्री नगर येथून अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूम मधील लाकडी कपाटातील लॉकर फोडून दिनांक 19/06/2025 रोजी दोन लाख सतरा हजार रुपये किमतीचे सोने- चांदी दागिने चोरी केली असल्याची तक्रार वाई पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली होती.

 त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणें यांनी पोलीस अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली तपास पथके तयार करुन त्यांना सदरचा 

तपास पथकांनी गुन्हयाच्या घटनास्थळी वेळोवेळी भेटी देवून फिर्यादी, साक्षीदार व आजुबाजूच्या लोकांच्या कडे माहिती मिळवत कौशल्याने तपास केला,  गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी लोकेश रावसाहेब सुतार रा. लिंगनोर ता. मिरज जि.सांगली याने केला असल्याचे निष्पन्न केले. त्या अनुषंगाने तपास पथक नमुद आरोपीच्या ठावठिकाण्या बाबत माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असताना 

दिनांक २४/०६/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना पोलीस रेकॉर्ड वरील आरोपी लोकेश रावसाहेब सुतार याने सदरचा गुन्हा त्यांच्या दोन साथिदाराच्या मदतीने केला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. तसेच नमुद दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्याबाबत तपास पथकास सुचना दिल्या. तपास पथकाने नमुद दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून त्यांची मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांचेकडून पोलीस कोठडी मंजूर करुन घेवून पोलीस कोठडी मुदतीत त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे तसेच वाई व सातारा तालूका पोलीस ठाणे हद्दीत देखील घरफोडी चोरी केले असल्याचे कबूल केले त्यांच्या कडून घरफोडी चोरीचे एकूण ४ गुन्हे उघड करुन नमुद गुन्हयात चोरीस गेलेले २३,०४,०००/- रुपये किमतीचे २४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आलेले आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक 

 तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली  डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, हसन तडवी, मुनीर मुल्ला मोहन पवार, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, रवि वर्णेकर, पृथ्वीराज जाधव, प्रविण पवार, संकेत निकम, शिवाजी गुरव यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे  तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा,डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सन्मानपूर्व अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.