Header Ads

नेर्ली येथे आषाढी एकादशीनिमित्त २५० वृक्षांचे वाटप; पर्यावरण रक्षणाचा संदेश.

 नेर्ली येथे आषाढी एकादशीनिमित्त २५० वृक्षांचे वाटप; पर्यावरण रक्षणाचा संदेश.

---------------------------------------

नेर्ली प्रतिनिधी

सलीम शेख 

---------------------------------------

 : आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आणि पर्यावरण संवर्धनाच्या उदात्त हेतूने नेर्ली येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते कृष्णात सुतार यांनी एक अनोखा उपक्रम राबवला.हा उपक्रम गेली ६ वर्षे राबवत आहेत.त्यांनी गावातील नागरिकांना तब्बल ८० नागरिकांना २५० मोठी झाडे वाटली.ही झाडे शेतकरी यांच्या बांधावर लावण्यात आली आहेत.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणाच्या रक्षणात हातभार लावणे हा होता.चला शेताच्या बांधावर जाऊया व आषाढी साजरी करूया अशी घोषवाक्य म्हणण्यात आले.

यावेळी नेर्ली गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्णात सुतार यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी भरभरून कौतुक केले. झाडे वाटून ती लावण्यासाठी आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी त्यांनी नागरिकांना आवाहन केले. पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ यापुढेही सुरू ठेवण्याचा मानस कृष्णात सुतार यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:

Powered by Blogger.